बालगीत शॉर्ट्स - मुलांसाठी गोड संगीताचा छोटासा अनुभव

बालगीत शॉर्ट्स हा कार्यक्रम म्हणजे लहानग्यांसाठी एकदम मस्त संगीतिक अनुभव आहे. डॉ. मानसी खासनीस यांनी खास करून या छोट्या पिल्लांसाठी बालगीतचं हे लहानसं, पण तितकंच धमाल असं सत्र तयार केलंय. आता बघा, काही पालकांना आपल्या मोठ्या सत्रात सहभागी होण्यापूर्वी संगीत थोडंसं अनुभवायला द्यायचं असतं, तर काहींना बालगीतच्या मुख्य सत्रात जागा मिळाली नाही पण तरीही एक अनुभव हवा असतो, अश्या सगळ्यांसाठीच "शॉर्ट्स" ही एक संधी आहे.
black blue and yellow textile
Book your next session!!

Next Session coming soon at Wakad, Pune.

सत्र कसं असतं?

हा कार्यक्रम ओमकाराच्या मंत्रोच्चाराने सुरू होतो, त्यामुळे बाळांना एकदम शांत आणि मोकळं वाटतं. मग हळूहळू गाण्यांमधून त्यांच्या मनातलं कुतूहल वाढत जातं. बालगीत शॉर्ट्समध्ये साधारण १० ते १२ गाणी असतात. यात लहान लहान कृतींमधून मुलांचं मन सतत गुंतवून ठेवलं जातं, म्हणजेच त्यांना कधी कंटाळा येत नाही... आता या गाण्यांबरोबरच, शरीराच्या हालचालींबरोबर तालात नाचणं, शरीराची ओळख होणं, मज्जा करणं, हे सगळं आहे. मजेत खेळता खेळता मुलं संगीतातले वेगवेगळे ताल, ठेके शिकत जातात.

संगीताचं महत्त्व काय?

मुलांना संगीताचं शिक्षण म्हणजे त्यांच्या बालवयातलं एक गोड आणि सृजनशील टॉनिकच आहे. संगीतातून त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, आणि भाषेचं कौशल्य वाढतं. पंचतंत्राच्या गोष्टींवर आधारित एक गाणंही त्यांना आम्ही या सत्रात ऐकवतो, त्याव्दारे मुलांना उत्तम साहित्याची ओळख होण्यास मदत होते. मुलांना तालवाद्यांचा प्रत्यक्ष अनुभव देतो, म्हणजे ते नुसतं ऐकून नाही तर वाजवूनही बघतात. त्यामुळे मुलांची श्रवणशक्ती आणि तालाची जाण वाढीस लागते.

हे सत्र पुण्यातल्या छान ठिकाणी भरवलं जातं. पालक आणि मुलासोबत प्रवेश शुल्क फक्त ₹८५० आहे. बाळांचा वयोगट १ ते ७ वर्षांचा असायला पाहिजे. म्हणून, चला मग! आपल्या लहानग्यांना या बालगीत शॉर्ट्सच्या सत्रामध्ये नक्की सहभागी करा आणि त्यांना संगीताचा गोडवा अनुभवू द्या.