Baalgeet Season 7- Carnival on 21st December2024 @ Zapurza. Click here to know more.

बालगीत सत्र ७ - संगीत कार्निव्हल

नमस्कार पालक मंडळी,

बालगीत सत्र ७ नंतर होणाऱ्या आपल्या संगीत कार्निव्हल मध्ये आपलं स्वागत आहे. सदर कार्यक्रम संपूर्णतः ऐच्छिक आणि सशुल्क आहे... शनिवार २१ डिसेंबर २०२४ रोजी झपुर्झा म्यूजियम ऑफ आर्ट अँड कल्चर, खडकवासला येथे संध्याकाळी ५:३० पासून कार्यक्रम संपन्न होईल. कार्यक्रमाची वेळ साधारण रूपरेषा खालील प्रमाणे असेल:

कार्यक्रमाची वेळ

* ०५:३० - ०६:०० : आगमन

* ०६:०० - ०९:०० : कार्यक्रम

* ०९:०० नंतर : जेवण आणि प्रस्थान

कार्यक्रमाची रूपरेषा

* मुलांची गाणी (बाणेर - दोन बॅच चे मिळून एक गाणे, सिंहगड रोड एका बॅच चे एक गाणे)

* पालकांची गाणी (बाणेर - दोन बॅच चे मिळून एक गाणे, सिंहगड रोड एका बॅच चे एक गाणे)

* द रिदम गेम मधील निवड झालेल्या स्पर्धकांची एकत्रित अंतिम फेरी

* वाद्यशोध स्पर्धेतील विजेत्यांचे सादरीकरण

* बालकाव्य स्पर्धेतील विजेत्यांचे सादरीकरण

* टीम बालगीत तर्फे काही गाण्यांचे सादरीकरण

* ऑप्शनल जेवणाने कार्यक्रमाची सांगता

black blue and yellow textile

यासाठी खालील प्रमाणे शुल्क असेल

* पालक/मुले : रुपये 700 प्रत्येकी

* फूड कुपन (ऐच्छिक) : रुपये 250 (पावभाजी + ३ ब्रेड)

खालील मुद्दे आवर्जून लक्षात घ्या :

* ऍडव्हान्स बुकिंग असेल तरच कार्निव्हल ला प्रवेश देण्यात येईल

* कार्निव्हल च्या दिवशी तिकिटांचा काउंटर सेल उपलब्ध नाही

* मुलांची आणि पालकांची गाणी वाद्यवृंदासोबत होतील

* पालकांना आणि मुलांना गाणी बालगीत कडून सांगितली जातील

* कृपया गाण्यामध्ये .. संघामध्ये बदल मागू नये, तो दिला जाणार नाही

* एकदा घेतलेले तिकीट रद्द किंवा दुसऱ्याला हस्तांतरित करता येणार नाही

* कोणत्यातही कारणात्सव तिकीट मूल्याचा रिफंड देण्यात येणार नाही

* रंगीत तालमीस अनुपस्थितीत राहिल्यास अंतिम कार्यक्रमात प्रवेश नाही, मात्र कार्यक्रम पहायला येऊ शकता

* फूड कुपन घेणे सर्वस्वी ऐच्छिक आहे

* कार्यक्रम ओपन एअर अँफी थिएटर मध्ये असल्याने उबदार कपडे आणि आपले बस्कर सोबत ठेवणे.

* आपली पाण्याची बॉटल सोबत ठेवलेली उत्तम

* पुरेसे पार्किंग उपलब्ध आहे